1.पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड.
चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड.
पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.
2.दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं,
त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात,
कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच..
3.तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल,
तर अविवाहित असतांना बदला.
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण
बदलू शकत नाही.
4.चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे..
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !
5.एक मुलगा देवाला विचारतो,
“तिला गुलाबाचं फूल का आवडतं ?
ते तर एका दिवसात मरून जातं !
मग तिला मी का आवडत नाही ?
मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो”!
देव उत्तर देतात,
भारी रे !
एक नंबर !
Whatsapp वर टाक !